ओडेसा
ओडेसा : रशियाच्या युक्तेन सोव्हिएट प्रजासत्ताकाचे काळ्या समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ९,४१,००० (१९७२). हे कीएफच्या दक्षिणेस ४४० किमी. असून येथे कृषी अवजारे, वाहतूक, छपाई, अन्नप्रक्रिया; लेथ, याऱ्या यांची सामग्री, मोटारींचे सुटे भाग जुळविणे; तेलशुद्धीकरण; पीठ, साखर, फळे, कातडी, गोण्या, दोर इत्यादींवरील प्रक्रिया; सुपरफॉस्फेट, आयोडीन, लिनोलियम, पोलादी दोर, पादत्राणे, कपडे यांचे कारखाने आहेत.